Count Down Begins!

Happy holidays!

×
Logo Design by FlamingText.com

कुलस्वामिनी देवी श्री तुळजा भवानी online दर्शन





 

🚩🚩🚩🌹🌹🚩🚩🚩

संग्रह -
महाराष्ट्राचे कुलदैवत मानली जाणारी तुळजाभवानी ही आपला शेजारी देश असलेल्या नेपाळच्या राजघराण्याचीही कुलदेवता आहे. नेपाळी भाषेत देगू तलेजूभवानी नावाने ओळखल्या जाणाऱ्या नेपाळमधली तुळजाभवानीची परंपरा वैशिष्टय़पूर्ण आहे.

"तुळजाभवानी चा पारंपारिक उत्सव "-भेंडोळी-"चा व्हिडीओ पाहण्यासाठी येथे अवश्य क्लिक करा."

छत्रपती शिवराय आणि आई तुळजाभवानी हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत. प्राचीन काळापासून तुळजाभवानीचे अस्तित्व हे फक्त भारतापुरते मर्यादित नसून तिचा महिमा उत्तर भारतापासून तो थेट नेपाळपर्यंत पसरलेला होता. त्यानुसार इ. स. १३२४ ला कर्नाटवंशयीय राजा हरिसिंगाने प्रथम नेपाळमधील भक्तपूर येथे तुळजाभवानीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली. त्यानंतर त्यांच्या वंशजांनी काठमांडू आणि पाटण येथे श्री तुळजाभवानीची मंदिरे स्थापन करून संपूर्ण नेपाळ तुळजाभवानीमय करून टाकला आहे. नेपाळी भाषेत तुळजाभवानीला देगू तलेजूभवानी म्हणतात. नेपाळमध्ये कर्नाट राजांनी बांधलेली तुळजाभवानीची मंदिरे ही नेवारी बांधकामशैलीची आदर्श उदाहरणे आहेत. उतरते छप्पर किंवा पॅगोडय़ाप्रमाणे आकार असणारी तलेजूभवानीची भव्य मंदिरे पर्यटकांचे लक्ष वेधून घेतल्याशिवाय राहत नाहीत.

"पारंपारिक उत्सव *-भेंडोळी-*चा व्हिडीओ बघण्यासाठी येथे नक्की क्लिक करा."

हिमालयाच्या पर्वतरांगांमध्ये वसलेल्या नेपाळचे क्षेत्रफळ एक लाख ४७ हजार १८१ वर्ग किलोमीटर असून हा देश ८०० किमी लांब आणि २०० किमी रुंद आहे. नेपाळमध्ये पूर्वी अनेक छोटी मोठी संस्थाने असल्याने या राजांच्या अधिकारक्षेत्रामुळे नेपाळचा भूभाग विविध संस्थानांत विभागला गेला होता. परंतु २१ डिसेंबर १७६८ साली पृथ्वीनारायण शाहा नावाच्या राजाने नेपाळमधील सर्व राजांना एकत्रित करून संयुक्त नेपाळची निर्मिती केली. त्यानंतर जवळपास २००८ पर्यंत नेपाळमध्ये राजेशाहीच होती. यादरम्यान नेपाळमध्ये मल्ल, शाहा आणि राजपूत या घराण्यांनी आपला राज्यकारभार केला. विशेष म्हणजे ही तीही घराणी मूळची हिंदुस्थानातील आहेत. या राजघराण्याबरोबरच नेपाळमध्ये ब्राह्मण, मोर, रजपूत, कायस्थ, मगर, गुरुंग, जरिया, नेवार, मुरची, किरत, लिंबस, लापचा याप्रमाणे अनेक समाजांचे लोक राहतात. हा सर्व समाज हिंदू असल्याने जगातील एकमेव हिंदू राष्ट्र म्हणून नेपाळची ओळख होती. नेपाळवर राज्यकारभार करणारे राजघराणे कुठलेही असले तरी देगू तलेजूभवानी ही त्यांची कुलदेवता असल्याने संपूर्ण नेपाळची कुलदेवता म्हणून तुळजाभवानीला सन्मान प्राप्त झाला आहे. हजारो वर्षांपासून नेपाळने आपली परंपरा जपली असून आजही अगदी तुळजापुराप्रमाणे त्याठिकाणच्या देवीच्या प्रथापरंपरा, पुजाअर्चा आणि विधी उपचार केले जातात.

"तुळजाभवानी चा पारंपारिक उत्सव"*भेंडोळी*"चा व्हिडीओ बघण्यासाठी येथे क्लिक करा."

तुळजाभवानी भक्त राजा हरिसिंग -
राजा हरिसिंगदेवाचे मूळ घराणे कर्नाटवंशीय असून त्यांच्या साम्राज्यविस्तार कर्नाटकापासून बंगालपर्यंत आणि त्यानंतर पुढे बिहारपर्यंत पसरला होता. राज्यकारभारामुळे या घराण्याच्या राजधान्या बदलल्या तरी दक्षिणेत असताना त्यांनी सुरू केलेली तुळजाभवानीची भक्ती कायम ठेवली होती. बिहार प्रांतात या घराण्याची राजधानी सिमरौनगढ या ठिकाणी असून मध्ययुगीन कालखंडात या भागाला मिथिला म्हटले जात होते. सध्याच्या बिहारमधील चंपारण्य जिल्ह्यत सिमरौा गढचा भाग मोडत होता. या ठिकाणी राज्यकारभार करत असताना दिल्लीचा सुलतान घियासुद्दीन तुघलकाने सिमरौनगढावर आक्रमण केले. तुघलकापुढे हरिसिंगाचा निभाव न लागल्याने त्यांनी आपली पत्नी देवलदेवी आणि पुत्र जयपालदेवसह नेपाळकडे पळ काढला. या वेळी ते आपल्या मुलीला वाचवू शकले नाहीत. कारण घियासुद्दीनने हरिसिंगाच्या मुलीला उचलून नेले होते. हरिसिंग हरले असले तरी त्यांनी देवीवर श्रद्धा ठेवून आपला पुढचा प्रवास चालू ठेवला. यावेळी त्यांनी आपल्यासोबत आपली कुलदेवता तुळजाभवानीची मुर्ती घेतली होती. आपल्या संरक्षणार्थ या लोकांनी नेपाळ जवळ केला. नेपाळच्या भक्तपूर भागात त्यावेळी रुद्र मल्ल नावाचा राजा राज्यकारभार करत होता. मल्ल म्हणजे पहेलवान. कधीकाळी कुस्तीच्या जोरावर या घराण्याने नेपाळमध्ये आपली सत्ता प्रस्थापित केली. मल्ल घराणे मुळचे उत्तर भारतातील अवध या ठिकाणचे रहिवासी असून ते सरजुबंशीयांचे वंशज असल्याने त्यांनी हरिसिंगाच्या कुटुंबाला आश्रय दिला. राज्य गेले, राजा गेला परंतु तरीही हरिसिंगाच्या वंशजांनी तुळजाभवानीची आस सोडली नव्हती. शेकडो वर्षांपासून चालत आलेली तुळजाभवानीची भक्ती त्यांच्या वंशजांनी पुढेही चालूच ठेवली होती. त्यामुळे आपल्या पदरी असलेल्या तुळजाभवानीच्या मुर्तीचा जप करत या लोकांनी अखेर नेपाळमध्ये राज्याश्रय मिळविला.
नेपालनरेश रुद्रमल्लने हरिसिंगाचा पुत्र जयपालदेवशी आपली मुलगी नायकदेवीचा विवाहलावून दिला. मल्ल घराण्याला वारस नसल्याने सर्व सत्ता जयपालदेवच्या हाती आली. साहजिकच तुळजाभवानीचा आशीर्वाद कायम आपल्या पाठीशी असल्याची भावना हरिसिंगाच्या वंशजांची होती. त्यामुळे हरिसिंगाच्या वंशजांनी प्रथमत: नेपाळमधील भक्तपूर या ठिकाणी श्री तुळजाभवानीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली.
🚩🚩🚩🌹🌹🚩🚩🚩

            ""तुळजाभवानी चा पारंपारिक उत्सव --भेंडोळी--चा व्हिडीओ बघण्यासाठी येथे क्लिक करा."

संग्रह -



                       INFORMATION ABOUT TULJAPUR


Tuljapur is situated in Osmanabad district and Tuljapur is well-known for GODDESS TULJABHAVANI.It is located on the hill of "Bala ghat".Tuljabhavani.The former name of Tuljapur was Chinchpur.Lord Tuljabhavani is Femous and family Deity(Kul-daiwata) of people over all India.She is also described as the impressive and formidable Goddess in Hindu Puranas, who is known to combat demons and evil forces and maintain the moral order and righteousness in the universe.
             The history of the temple has been mentioned in the "skanda puran". There was a sage known as "Kardabh" After his death his wife "Anubuti" had performed a penance at the banks of river "mandakini " for Bhavani mata to look after her infant child. While performing the penance the demon known "Kukur" tried to disturb her penance during which Mata Bhavani came to the aid of "Anubuti" and killed the demon "Kukur". From that day onwards the Goddess Bhavani came to be known as Tulja Bhavani.  The same place is today known as Tuljapur.Nizam or Adhilshah both were not interfaced in riligious things.There was about 5000 Peoples lived in Tuljapur at 1920.
             While going to Temple of Bhavani.There is Main gate named as "Mahadwar".After crossing "Nimbalkar Darwaja" comes the main temple. Around the temple on all four sides there is open space for revolution.A hall(Sabha-Mandap) has eight-column and On west direction there is sanctum(Gabhara).Small images of different gods and goddess are carved on the stones.Also Gabhara is build by stones
             In center of 2æthat Sanctum we saw an idol(Devi).The idol is carved out by special black stone named as Gandhakee.Which we find in River Gandhakee.She has eight hands.Near the right shoulder there is moon and near the left shoulder the sun is carved. The idol has eight hands. Various types of weapons are in her palms.In one of her right palms she holds a trishoola (a three pointed spear) which she has stabbed in the chest of a demon Mahishasura. Her right foot is pressed on the demon. The left leg is straight on the ground. Between her two legs there is the beheaded head of a male-buffalo.
             During the period of Aswin Chitra Pratipada to Astami,Paus Shudha Pratipada to Ashtami and Bhadrapad vadya Astami to Amawasya She moves towards palanga.

आपल्या कुटुंबियांच्या वतीने कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी चरणी देवीची सेवा अथवा विधी करावयाचे असतील. विधी करून श्रींचा चरणस्पर्श नारळ प्रसाद ,कुंकू अंगारा आपणास आपल्या पत्त्यावर पाठवला जाईल त्यासाठी खालील नंबर वर संपर्क साधावा.


श्री गजानन लसणे
+91-9822806772

श्री देवीजींच्या ONLINE DARSHAN व इतर इतिहास जाणुन घेण्यासाठी खालील लिंकला क्लिक करा.
Tuljbhawani.in

"तुळजाभवानी चा पारंपारिक उत्सव भेंडोळि चा व्हिडीओ बघण्यासाठी येथे क्लिक करा."

                   श्री देवीजींचे नित्योपचार व पुजा वगैरे

 पहाटे ४ वाजता : मंदिर उघडले जाते तसेच मुख्य प्रवेशद्वारावर चौघडा वाजवून नित्योपचार विधी सुरु होत असल्याचे जाहीर केले जाते.
पहाटे ५ वाजता : चरणतीर्थ पूजा.
५ ते ७ : धर्मदर्शन
सकाळी ७ ते ११ : अभिषेक पूजा.
स.११ ते ११:३० वाजता : अलंकार पूजा व आरती
स. ११:३० ते रात्रौ ७ पर्यंत : अलंकार दर्शन
रात्री ७ ते ९ : अभिषेक पूजा
रात्री ९ ते ९.३० : प्रक्षाळ पूजा
रात्री ११ वाजता मंदिर(निंबाळकर दरवाजा) बंद होते. विशेष प्रसंगी मंदिर पहाटे १ वाजताही उघडण्यात येते.

संकलन-
                             मराठीत माहिती

उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर तीर्थ समुद्रसपाटीपासून २६०० फुट इंच असून येथील भवानी मातेचे मंदीर बालाघाट डोंगरच्या कडेपठारावर वसले आहे. या डोंगराचे पूराण ग्रंथातील जुने नाव यमुनागिरी असे होते. कालांतराने या स्थानी चिंचेची झाडे असल्यामुळे त्याचे नामकरण चिंचपूर झाले. नंतर तुळजाभवानीच्या नावाने लोक तुळजापूर म्हणू लागले.संपूर्ण भारतात कुलदेवता म्हणून या देवीला मान आहे. कृतयुगात -अनुभूतीसाठी, त्रेत्रायुगात -श्रीरामचंद्रासाठी, द्वापारयुगात - धर्मराजासाठी व कलियुगात-छत्रपती शिवरायांसाठी आशीर्वादरूप ठरलेली ही भवानी भक्ततारिणी, वरप्रसादिनी आहे. अनेक प्रदेशांतून विविध जाती-पंथांचे भाविक इथे येतात.एवढेच नव्हे तर मातेचे भक्त हिन्दुस्तनतच नव्हे तर परदेशातही आहेत. हे स्थान उस्मानाबाद जिल्ह्यात असून उस्मानाबाद व सोलापूर ही जवळची रेल्वे स्थानके आहेत.

        उस्मानाबाद - तुळजापूर अंतर १९ कि.मी. आहे.व सोलापूर येथून ४५कि.मी. आहे. सोलापूर, उस्मानाबाद, औरंगाबाद, जळगाव,मुंबई, पुणे, कोल्हापूर या ठिकाणांहून तुळजापूरला थेट बसची सोय आहे.

कृतयुगात कर्दभ नावाचे तपोनिष्ठ ऋषी होऊन गेले. त्यांची पत्नी अनूभुती रुपसंपन्न असून पतिव्रता होती. सुदैवाने तिला पुत्ररत्न प्राप्त झाले.परंतु त्यांचा सुखी संसार फार काळ टिकला नाही. कारण कर्दभ ऋषींनी लवकरच इह्लोकीची यात्रा संपविल्यामुळे अनुभुतिने सति जाण्याचा निर्णय घेतला; परंतु अल्पवयीन पुत्राला मागे सोडून पतिसोबत सहगमन करू नये असे ऋषींनी शास्त्राचा आधार घेऊन सांगितले असता अनुभूतीने आपल्या पुत्राला गुरुगृही सोडुन ती मेरू पर्वतानजिक असलेल्या मंदाकिनी नदीच्या परिसरात गेली. आणी तिथे आश्रम बांधून तिने तपश्चर्या सुरू केली. तिची तपश्चर्या सुरू असताना कुकर नावाचा दैत्य तिच्या अप्रतिम सौंदर्यावर लूब्ध झाला.त्याच्या मनात पापवासना निर्माण होऊन त्याने तिला स्पर्श केला त्यामुळे तिची समाधी भंग पावली. दैत्याने काही अनुचित प्रकार करु नये म्हणून तिने आदिशक्तिचा धावा केला. यासाठी की शक्तीने या दैत्याच्या तावडीतून आपली सुट्का करावी आणी खरोखरच देवी भवानी मातेच्या रुपाने त्वरित धावून आली. तिने दैत्याशी युदध केले. दैत्यही महिषाचे रूप घेऊन आला. तेव्हा देविने त्रिशुळाने त्याचे शीर वेगळे केले.ही भवानी देवी वेळीच अनुभूतीच्या रक्षणासाठी त्वरित धावून आल्यामुळे तिला त्वरिता असे नाव पडले. कालांतराने त्वरिताचे-तुरजा व त्याचे पुढे तुळजा झाले.निजामशाही असो किंवा आदीलशाही असो कोणीही धार्मिक बाब्तीत हस्तक्षेप करीत नसत.1920 पर्यंत या गावात एकही धर्मशाळा नव्हती.या साली गावची लोकसंख्या सूमारे 5000 एव्हडी होती.

        भवानी मातेच्या मंदिरात जाण्यासाठी काही पाय-या उतरल्यानंतर महाद्वार लागते.त्यावरील काही शिल्प हेमाड्पंथी असून तिथे नारद मुनींचे दर्शन घडते. पुढे गेल्यावर कल्लोळ तीर्थ लागते. देवी इथे आल्यानंतर जेव्हा या तीर्थाची निर्मिती केली. तेव्हा पृथ्वीवरील सर्व उदकतीर्थे या तिर्थास धावून आल्यामुळे त्यांचा एकच कल्लोळ झाला. यास्तव या तीर्थास ’कल्लोळ तीर्थ’ म्हणतात.


           ""स्नान कल्लोळ तीर्थाठायी।दर्शन घेई देवीचे॥ घेता चरण तीर्थोदय।होय जन्माचे सार्थक॥""


       या तीर्थापसून समोरच गोमुख तीर्थ लागते. त्यातून अहोरात्र पाण्याचा प्रवाह वाहतो.त्याचप्रमाणे श्रीदत्ताचे हस्तप्रक्षालनाचे ठिकाण आहे.पूढे गेल्यावर अमृतकुंड लागते. त्याच्या अलीकडे गणेश मंदिर आहे.येथे सिद्धीविनायक आहे.नंतर निंबाळकर दरवाजा लागतो. दरवाजा ओलांडून आत गेले असता मातेचा कळस नजरेस पडतो.हा कळस पंचधातूपासून बनविला आहे.मंदिराच्या दर्शनी बाजुस होमकुंड आसून त्यावर शिखर बांधले आहे. मंदीराचा सभामंडप सोळाखांबी असून पश्चिम दिशेला मातेचा गाभारा आहे.इतिहास व पुरातत्त्वदृष्ट्या हे मंदिर राष्ट्रकुट अथवा यादवकालीन मानले जाते.

गाभा-याचे मधोमध चांदीच्या सिंहासनावर आरूध झालेली भवानी मातेची मूर्ती गंडकी शिळेची असून तिने विविध शस्त्रे धारण केलेली आहेत. देविने एका हातात महिषासुराची शेंडी धरली आहेत. तर दूस-या हाताने त्याच्या बरगडीत त्रिशुल खुपसला आहे. तिच्या उजव्या पायाखाली महिषासूर व डाव्या बाजुला सिंह आणि पूराण सांगणारी मांर्केडेय ऋषीची मुर्ती दिसते. देविच्या उजव्या खांद्याजवळ चंद्र व डाव्या खांद्याजवळ सुर्य कोरलेला दिसतो.देविला स्पर्श कोणालाही करता येत नाही.देवीला पूर्वी 3 वेळा पूजा केली जात. आता मात्र सकाळ-संध्याकाळ अशी 2 वेळा पूजा केली जाते.‍ गाभा-याच्या उत्तरेस शयनगृह असून त्यात मातेसाठी एक चांदीचा पलंग ठेवला आहे.तसेच दक्षिण दिशेला देविचे न्हाणीघर आहे. आश्विन शुद्ध प्रतिपदा ते अष्ट्मी, पौष शुद्ध प्रतिपदा ते अष्ट्मी व भाद्रपद वद्य अष्ट्मी ते अमावस्या अशी देविची तीन शयन वर्षे ठरली असून इतर वेळी ती अष्टौप्रहर जागृत असते.(असे इतरत्र आढ्ळत नाही)

       सभामंड्प ओलांडून गेल्यावर पुर्वेला भवानी शंकराची वरदमुर्ती ,शंकराचे स्वयंभू पिंड ,पाठीमागे नंदी, नंदीवर भवानीशंकराचा मुखवटा व त्यावर पंचनागाचा उभारलेला फणा आणि सतत तेवत असणारा नंदादीप दृष्टीला पडतो. मंदीराचे परिसरात श्रीनृसिंह ,खंडोबा ,चिंतामणी या देवतांच्या मुर्ति दृष्टीस पडतात.

                              येथील काही प्रेक्षणीय स्थळे:-

१)काळभैरव:-- हे स्थान श्रीक्षेत्र काशी प्रमाणेच येथे डोंगराच्या कड्यावर आहे.भोवताली रम्य झाडी असून पावसाळ्यात उंचावरून पाणी पडते. हे स्थान दर्शनीय व रमणीय आहे.

२)आदिमाया व आदिशक्ति:-- देवळाच्या मुख्य व्दाराजवळ उजव्या हाताकडे आदिमाया व आदिशक्ति ही देवता आहे.

३)घाटशीळ:-- डोंगराच्या उतरणीवर किल्लेवजा,मजबूत,सुंदर देवस्थान आहे. आंत देविच्या पादूका आहेत.घाट्शीळवर उभारून देविने श्रीरामाला सीतेचे रूप घेऊन श्रीलंकेचा मार्ग दाखविला.तेव्हा रामाने देविला ओळखले व तो म्हणाला’तु का आई’ येथे असलेल्या कमानी पूर्वी रजाकारांवर देखरेख करण्यासाठी वापरत.जवळच मंदीर संस्थानने बांधलेली बाग आहे.

४)पापनाश तीर्थ:-- हे एक तीर्थ असून पापनाशिनी: असे याचे प्राचीन नाव आहे.येथे स्नान केल्याने लोकांचे पापातून सुटका होते. अशी लोकांची धारणा आहे.देऊळ जुने पण मजबूत आहे.

५)रामवरदायणी -येथे रामवरदायनी नावाची देवी असून जेव्हा श्री रामचंद्र वनवासात गेले होते. तेव्हा सितेला शोधण्यासाठी रामचंद्र येथे आले असते या देविने त्यांना वर दिला व योग्य मार्ग दाखवीला.याच्या मागच्या बाजूस चंद्रकुंड व सूर्यकुंड नावाची पाण्याची ठिकाणे आहेत.

६)भारतीबूवाचा मठ:-- देवळाच्या मागील बाजूस म्हणजे शिवाजी दरवाजा उतरून खाली गेल्यावर हा मठ लागतो.याचे मुळ पूरूष रणछोड भारती. यांच्यासोबत श्रीदेवी सरिपाट खेळत असे. मठ जुना,मजबूत व प्रेक्षणीय आहे.

७)गरीबनाथाचा मठ:--हया मठात गोरगरीबांना सदावर्त दिले जात होते. हा मठ सध्या खड्काळ गल्लीत आहे.

८)नारायणगिरीचा मठ:-- हा मठ दशनामगिरी गोसाव्याचा होत. सध्या हा येथिल क्रांती चौकात आहे.

९)मंकावती तीर्थ:--मंकावती कुंड हे तुळजापूरातील एक मोठे पवित्र कुंड आहे.असे म्हणतात की या कुंडात स्नान केल्याने अंग पवित्र होते. याला विष्णू कुंड असेहि म्ह्णतात.यावर महादेवाची पिन्ड आहे.तसेच मोठे मारुति मंदीर आहे.त्याचबरोबर याज्ञवाल्यक्य महाराजांचा आश्रम येथे आहे

१०)धाकटे तुळजापूर:--येथून जवळच धाकटे तुळजापूर हे गाव आहे. या ठिकाणी तुळजा मातेची बहीण वास्तव करते.

 संकलन-
       महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणून तुळजाभवानी देवीस अग्रमान आहे. स्वराज्य संस्थापना करणारे छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची ही कुलदेवता होय. या देवीच्या आशीर्वादाने शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेची प्रेरणा मिळाली. देवीने महाराजांना दृष्टांत देऊन महाराष्ट्रावरील दुष्टचक्राचे निवारण करण्यासाठी भवानी तलवार दिली होती, अशी आख्यायिका आहे. भोसले घराण्याची ही कुलदेवता असून रामदास स्वामी हे देखील उपासक होते.


श्री तुळजा भवानीची संपूर्ण आरती https://drive.google.com/file/d/0B8jCKpvgY6egQlJVM3piMGJoNlk/view?usp=docslist_api


No comments: