Count Down Begins!

Happy holidays!

×
Logo Design by FlamingText.com

माईलस्टोन

 
शिक्षक मित्रहो,
        पुनश्च एकदा नमस्कार,
अध्यापन साहित्याची देवाण-घेवाण करण्याचे ब्लॉग,इंटरनेट ही प्रभावी माध्यमे ठरत आहेत.
मात्र रोचक माहितीने परिपूर्ण अंतर जालाच्या जाळ्यात आपणच सर्च करता -करता फसून जातो,थकून जातो.
बर्याच वेळेला हवी ती माहिती मिळण्याऐवजी इतरत्र आपण भरकटत जातो व मूळ हेतूच बाजूला राहतो.
मित्रांनो या सदरात शैक्षणिक व सहज ज्ञानवर्धक ,मनोरंजक बाबी उपलब्ध करून देण्याचा माझा प्रयत्न असेल.
या facts मी इतर ठिकाणाहून डाऊनलोडकेलेल्या असून त्याची मालकी,copyrights माझे नाहीत हे लक्षात घ्यावे.
सदर माहिती आपण परिपाठात,वर्ग अध्यापनात सांगून अध्यापन अधिक सुलभ,सहज बनवू शकतो.
आपल्या कमेंट्स माझ्यासाठी महत्वपूर्ण आहेत.सदर आवडल्यास नक्की कमेंट करा.share करा.ब्लॉग वर आपले मत व्यक्त करायला विसरू नका.

   '' GOOD COUNTRY INDEX '' वर भारत ८१ व्या स्थानी-
                        
विज्ञान-तंत्रज्ञान,जागतिक शांतता,शिक्षण,सुरक्षा,प्रदूषण,आरोग्य,अशा जवळपास ३५ घटकांच्या उपलब्ध डेटावरून आंतरराष्ट्रीय समुदायाने  '' GOOD COUNTRY INDEX ''तयार केला आहे.जागतिक पहिला क्रमांक irland ने मिळवला असून भारत ८१ व्या स्थानी आहे.विज्ञानात    भारत ५६ वा,संस्कृतीत ५३ वा,वातावरांदृष्ट्या १०७ वा तर आरोग्याच्या दृष्टीने ३७ वा ठरला आहे.१२५ देशांच्या एकून अभ्यासात लिबिया आणि इराक सर्वात शेवटी असून केनिया प्रथम आहे. 


  
APPLE,MICROSOFT,GOOGLE,HP अशा INFORMATION TECHNOLOGY मध्ये जगप्रसिद्ध असलेल्या या कंपन्यांची सुरुवात घरातील garage मधून झाली होती.



१८९६ मध्ये इतिहासातील सर्वात कमी काळाचे युद्ध झांझिबार आणि इंग्लंड यांच्यात झाले.युद्ध सुरु झाल्यानंतर अवघ्या ३८ मिनिटात झांझिबार या देशाने इंग्लंडपुढे शरणागती स्वीकारली होती.



जगप्रसिद्ध BARBY DOLL चे पूर्ण नाव BARBERA MILICENT ROBERTS असे आहे.



                          SELF ATTESTED DOCUMENTS- आज कोणत्याही कागदपत्राची दुय्यम प्रत कार्यालयात,कोर्टात सादर करायची असेल तर ती अधिकृत व्यक्तीकडून किंवा स्वत: attest करावी लागते.LATIN भाषेतील शब्द ATTESTARI याचा अर्थ असा आहे-''एखाद्याचा साक्षीदार बनणे''.जि व्यक्ती कागदपत्रांची COPY ATTEST करते,ती कायद्याच्या दृष्टीने साक्षीदार असते

.
भारतात COFFEE एका हज यात्रेकारुने आणली.त्याचे नाव होते''हाजी बाबा बुदान''.१६०० सालच्या आसपास ते चीकमंगळूरला आले.तेथे झोपडे बांधून त्याबाहेर COFFEE च्या बिया पेरल्या.तीझाडे एका ब्रीटीशाने शोधून काढली.अधिक माहितीसाठी ईथे क्लिक करा.

भारतीय शास्त्रज्ञांनी क्षेपनास्त्र बांधणीला सुरुवात केरळ मधील तुम्बा या छोट्या गावातील पडक्या CHURCH मध्ये केली.सुरुवातीला डॉं.वसंत गोवारीकर,डॉं.अब्दुल कलाम.डॉं.सतीश धवन प्रा.यु.आर.राव या शास्त्रज्ञांनी केलेल्या कार्यामुळे १९७५ मध्ये आर्याभात्त,१९७९ मध्ये भास्कर व रोहिणी हे उपग्रह विकसित करून प्रक्षेपित करता आले.

गोमंतकीय FASHION DESIGNER वेन्द्रेल रोद्रीग्स यांनी आपण वापरत असलेला कोणताच पोशाख भारतीय नसल्याचे निदर्शनास आणून दिलेय-

शर्ट-युरोपातून भारतात आला.
PANT व पायजमा -चीन व मध्य आशियातून आला.
                          कुर्ता-मुघलांनी भारतात आणला.
                          अंतर्वस्त्र-युरोपातून आली.
                       

No comments: