Count Down Begins!

Happy holidays!

×
Logo Design by FlamingText.com

विविध कार्यक्रम







🌺🌹🌺: 🙏🌷🌹🌷
श्री सुहास श्रीरंग कोळेकर

प्राथमिक शिक्षक
(प्रभारी मुख्याध्यापक )

जिल्हा परीषद प्राथमिक शाळा ,कायरे

ता.पेठ,जि.नाशिक

🏡थोडक्यात ओळख -

 आदिवासी भागात सेवा देणे हे नेहमीच एक आव्हानात्मक काम राहिले आहे .जेमतेम साहित्याची उपलब्धता,जीवनावश्यक वस्तू व सुविधाची वाणवा,परंपरागतता इ.अनेकविध समस्यांचा सामना करत शैक्षणिक पोषक वातावरण निर्माण करणे हे माझ्यासाठी सुरुवातीला अतिशय अवघड होते .18जुलै 2007 रोजी नियमित सेवेत रुजु झालेला मी बनगरवाडीच्या पोरसवदा मास्तरसारखाच होतो.2007-2015 या काळातील शैक्षणिक , सामाजिक कार्यादवारे तसेच लोकसहभागाच्या माध्यमातून या गावातिल शैक्षणिक विचारसरणी प्रगल्भ बनविण्यासाठी हातभार मिळाला.
   
🏡आमचे उपक्रम -

🚸१-विपुल लोकसहभाग-

कायरे येथील दवीशिक्षकी शाळेतुन व जेथे लोकांचे दरडोई उत्पन्न २०० रु.हि नाहि अशा ठिकाणी लोकसहभागाच्या कल्पना राबविणे अवघड होते .मात्र गतवर्षातिल शैक्षणिक कार्य व प्रतिसाद पाहता २६जानेवारी २००९ रोजी श्री कोळेकर सरांच्या हाकेला ओ देत पालकांनी शिक्षक ,सरकारी कर्मचारी ,सरपंच व ग्रामस्थांनी मिळुन तब्बल 18,000रु.दिले,ज्यातुन तालूक्यात सर्व प्रथम लाकडी बेंचेस शाळेसाठी घेण्यात आले.शिवाय महापुरुषांच्या फोटो साठी ८०००रु,वार्षिक स्नेहसंमेलनावेळी ६७००रु.,तसेच कृषि विभागांतर्गत ग्रामपंचायतीस मिळालेला संगणक सरपंच श्री पुंडलिक सातपुते यांनी शाळेस भेट दिला.या कामी डॉ.महाजन,ग्रामसेवक मगर,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्य यांचे मोलाचे सहकार्य लाभले.🌺🌹🌺:

🚸तंत्र शिक्षण /डिजिटल शिक्षणावर भर-
    शाळेकडे भेट मिळालेला संगणक ,माझा(कोळेकर सरांचा)वैयक्तिक laptop,व tablet ई.साधनांचा अध्ययन -अध्यापनात भरपुर वापर केला जातो.हि साधने विद्यार्थ्यांना वापरावयास दिली जातात .त्यामुळे ७०% विदयार्थी संगणकातील paint,powerpoint,word.इ.हाताळु शकतात.

मी स्वतः शाळेच्या नावाने ब्लॉग बनविलेला असुन त्याच्या मार्फत सुद्धा शिकविले जाते.
ब्लॉग - zpprimaryschoolkayre.blogspot.in
ब्लॉग ला विविध ठिकाणांवरुन चांगला प्रतिसाद मिळतो आहे .
🌺🌹🌺:

🚸सामाजिक कार्य -
  आरोग्य ,स्वच्छता,वृक्षारोपण ,ग्रामस्वच्छता यासाठी वेळोवेळी आरोग्य विभाग ,वन विभाग यांना शाळेतील विविध उपक्रम ,कार्यक्रमात सहभागी करुन घेऊन वीवीध उपक्रमाचे आयोजन केले जाते.
🌺🌹🌺:

🚸कृतिसंशोधन-
     ई.३री व ई.४थी च्या विदयार्थ्यांसाठी english medium प्रमाणे अस्खलित लेखन वाचन करता यावे यासाठी जि.प.नाशिकच्या वतीने english अध्ययन समृद्धी कृती संशोधन केले आहे .त्याचा शाळा पातळीवर खुप फायदा झाला असुन शाळेतील बहुतांशी माजी विदयार्थी नामांकित english medium schools मधुन शिक्षण घेत आहेत .विदयार्थी अस्खलित कर्सिव राईटिंग हि करतात व वाचतात.

🚸मागील 3वर्षात शाळेतिल 2 विदयार्थी आदिवासी शासकिय विदयानिकेतन व शिष्यवृत्ति परीक्षेत जिल्हा गुणवत्ता यादित चमकले आहेत.
🌺🌹🌺: 🚸सामाजिक -
  शिक्षक व उत्साही नवयुवकांच्या मदतीने गावात रात्र सौर अभ्यासिकाहि चालवलि जाते.सायंकाळी ६.०० ते रात्री ८.३० या वेळेत गावातील उच्च शिक्षित युवक विदयार्थ्यांसाठी शिकवण्याचे कार्य करतात.

🚸शाळेत वेळोवेळी हस्तलिखित व भीत्तीपत्रके बनवण्यात येतात.
🌺🌹🌺: शाळेत ई.१ली ते ५वी पर्यंत वर्ग असुन एकुण पटसंख्या ६५ आहे🌺🌹🌺:
🚸शाळेत हस्ताक्षर स्पर्धा ,वेशभुषा स्पर्धा ,शुदधलेखन स्पर्धा ,आदर्श विदयार्थी व विदयार्थीनी स्पर्धा ,चित्रकला स्पर्धा व ईतर प्रासंगिक स्पर्धा व कार्यक्रम घेतले जातात .

















No comments: