..... माझे मनोगत ....
नमस्कार शिक्षक मित्रांनो,
मी सुहास श्रीरंग कोळेकर,,प्राथमिक शिक्षक,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कायरे, तालुका _पेठ ,जिल्हा_नाशिक येथे मागील ८ वर्षांपासून सेवेत आहे.महाराष्ट्रातील सर्वच शिक्षकासाठी आदिवासी भागात सेवा देणे नेहमीच एक आव्हान राहिले आहे.पण येथेही जिल्हा परिषद शिक्षकाने केले असेल तेवढे काम दुसर्या कोणी केले असेल असे मला वाटत नाही.
नोकरीच्या सुरुवातीला काम करणे जरी जड जात असले तरी,जाणीव झाली कि खरा शिक्षक जागा होतो असे माझे वैयक्तिक मत आहे.आमचेही काम आधी केवळ वर्गापुरतेच मर्यादित असायचे.सर्वांगीण विकासासाठी झटायला खरी सुरुवात एका वर्षानंतर झाली.तेव्हापासून प्रिंट मिडीयाच्या संपर्कात आलो.तेव्हा कळत गेले कि आपण किती मागे आहोत,किती काम अजून करावयाच बाकी आहे.विद्यार्थ्यांशी नाते तेव्हाच जडते जेव्हा आपण त्यांना आपले समजतो,त्यांच्या समस्यांशी एकरूप होतो.तेही आपल्याशी एकरूप होतात.अशावेळी त्यांच्या विकासासाठी केवळ वर्ग अध्यापन पुरेसे नसते.
ब्लॉग बनवण्याचा माझाही हेतू फक्त दृक्श्राव्य साहित्य गोळा करणे एवढाच होता सुरुवातीला,पण इतर ब्लॉगर्स शिक्षकांच्या संपर्कात येत गेलो आणि समजत गेले कि आपणही आपले उपक्रम,कल्पना,माहिती इतरांशी share करायला हव्या,इतरांच्या आयाडिया समजून त्या आपल्या शाळेवर आचरणात आणायला हव्यात.आणि महाराष्ट्रातील तमाम शिक्षकांशी जोडले राहण्याचा ब्लॉग हा एक सोपा मार्ग मला वाटला.या ब्लॉग मार्फत आम्ही आमच्या शाळेच्या कल्पना,उपक्रम,विविध प्रसंग,व प्रेरक इतरही शाळांची आपणास ओळख करून देणार आहोत.आमचा हा प्रयत्न कसा वाटला हे नक्की कळवा.त्याने आम्हाला प्रेरणाच मिळेल.आपल्या रीप्लायची आम्ही वाट पाहू.तुम्ही मला पर्सनली ई_मेल हि पाठवू शकता.त्यासाठी ईथे क्लिक करा.
धन्यवाद.
श्री.सुहास श्रीरंग कोळेकर.(तुळजापूर)
प्रा.शी.जि.प.शाळा,कायरे.
ता .पेठ,जि.नाशिक .
4 comments:
सुहास सर प्रथम हार्दिक अभिनंदन,
आपल्या ब्लॉगला आज प्रथमच भेट दिली असता अतिशय नियोजनबध्द ब्लॉगवर केलेली मांडणी खूप आवडली. आपण आपल्या ब्लॉगवर उपलब्ध करुन दिलेली माहिती निश्चितच सर्व शिक्षकांना खूप उपयोगी येणारी आहे. आपल्या या कार्यास हार्दिक श्ाुभेच्छा .....
रोहोकले सर,
धन्यवाद.
आपल्यासाराख्यान्मुळेच आम्हाला प्रेरणा मिळत राहते.
आपल्या प्रतिक्रिया माझ्यासाठी अनमोल आहेत.
अधिक चांगले कार्य करण्यासाठी त्यातून प्रेरणाच मिळते.
पुनश्च धन्यवाद सर.
सुहास सर सर्वप्रथम आपले ब्लॉग बनवल्या बद्दल हार्दिक अभिनंदन !अतिशय सुंदर व नियोजनबद्ध मांडणी मुळे या ब्लॉगचा महाराष्ट्रातील सर्व शिक्षकांना निश्चितच फायदा होईल. आपल्या कार्यास माझ्या हार्दिक शुभेच्छा!
खूप खूप धन्यवाद बळीराम सर
Post a Comment